बाजारातील ५७ हजार गाड्या हार्ले डेव्हिडसन मागवणार परत


शिकागो – ५७ हजार गाड्या दुचाकी वाहन निर्मितीतील अग्रेसर असणाऱ्या हार्ले-डेव्हिडसन कंपनीकडून परत मागवणार असल्याची घोषणा केली आहे. मोटरसायकलला असणाऱ्या ऑईल कुलरवरील पकड अयोग्य पद्धतीने बसवण्यात आली आहे, त्यामुळे तेलगळती होण्याचा धोका असल्याने या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. हार्ले यांनी ग्राहकांच्या सुरक्षेसाठी गाड्या कंपनीकडे परत पाठवणे हा एक ऐच्छिक पर्याय असल्याचे सूचित केले आहे

या सूचनेद्वारे २०१७ सालात विकले गेलेल्या इलेक्ट्रा ग्लाईड अल्ट्रा क्लासिक, पोलीस एलेक्ट्रा ग्लाइड, स्ट्रीट ग्लाइड स्पेशल, रोड ग्लाइड आणि रोड ग्लाइड स्पेशल या जुलै २०१६ ते मे २०१७ पर्यंत तयार करण्यात आलेल्या मोटरसायकल परत मागवण्यात आल्या आहेत. या प्रकारची तेलगळती झाल्यानंतर ते मागील चाकावर पसरले जाते त्यातून मोठा अपघात होऊ शकतो.

कंपनीकडे यापूर्वी तेल गळती होत असल्याच्या नऊ तक्रारी आल्या होत्या. दोन जणांच्या गाड्या अपघातग्रस्त झाल्या तर एका दुचाकीस्वाराला किरकोळ जखम झाल्याची तक्रार कंपनीकडे आली आहे. कंपनीकडून चूक घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंपनीने यापूर्वीही क्लचमधील बिघाडामुळे पेनेसेल्व्हानिया येथील कारखान्याला ताळे ठोकले होते. त्यावेळेस २७ हजार गाड्या परत मागवण्यात आल्या होत्या. ग्राहकांना विक्रेत्यांकडून त्यांच्या दुचाकीची तपासणी आणि दुरुस्ती ही मोफत करुन मिळणार असल्याची माहिती कंपनीच्या सुत्रांनी दिली आहे. पुढील मंगळवारपासून याची सुरुवात करण्यात येणार आहे.

Leave a Comment