गूगलने डूडलच्या माध्यमातून केले पर्यावरण रक्षण करण्याचे आवाहन


डूडलच्या माध्यमातून गूगल कायमच वेगवेगळे प्रयोग करुन आपल्या वापरकर्त्यांना अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आज गूगलने पर्यावरणाचा संदेश देणारे डूडल तयार करुन गूगलच्या वापरकर्त्यांना पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला आहे.

गूगलच्या अक्षरांप्रमाणेच आपले आयुष्य रंगीबेरंगी असले तरीही ते पर्यावरणपूरक असणेही तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे अतिशय समर्पक आणि सुटसुटीत डूडल गूगलेने बनवत पर्यावरणालाही महत्त्व द्यायला हवे हे सांगितले आहे. एरवी दिसणारी कलरफूल अक्षरे हिरव्या रंगात रुपांतरीत होतात आणि त्यावरील पानांमुळे झाडे लावण्याचा संदेशही गूगलने दिल्याचे दिसते.

जगभरात ५ जून हा पर्यावरणदिन म्हणून साजरा केला जात असताना तंत्रज्ञानाचा वापर करतानाच पर्यावरणही जपा असेच गूगलला सांगायचे आहे. आपले आताचे जगणे आणि येणाऱ्या पिढीचे जीवन सुकर होण्यासाठी अशाप्रकारे झाडे लावण्याची आणि त्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्याची गरज असल्याचे या डूडलमधून सांगितले आहे.

Leave a Comment