या चर्चमध्ये रोबोट पाद्री देतो आशीर्वाद


कोणत्याही चर्च, मंदिर अथवा अन्य धार्मिक वास्तूत प्रवेश करताना माणसाची मुख्य अपेक्षा आशीर्वाद मिळावेत अशी असते. चर्चमध्ये हे काम पाद्री करतात तर मंदिरात पुजारी, पंडित भाविकांना आशीर्वाद देतात त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात. जर्मनीतील एका चर्च मध्ये मात्र दुवा देण्याचे हे काम एक रोबो करतो. त्याचे नावच मुळी ब्लेस यू टू असे आहे.

हा रोबो भाविकांना जेव्हा हात उंचावून आशीर्वाद देतो, तेव्हा त्याच्या हातातून प्रकाशही येतो. विटेनबर्ग मध्ये हा रोबो लाँच केला गेला आहे.जर्मन पाद्री मार्टीन ल्यूथरच्या द नाईंटी थिसिसच्या प्रकाशनाला ५०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा रोबो लाँच केला गेला आहे. विशेष म्हणजे आशीर्वाद देताना हा रोबो भाविकांना तुम्हाला पुरूष पाद्रयाच्या आवाजात आशीर्वाद हवा की महिला पाद्रयाच्या आवाजात हवा अशी विचारणा करतो, तुम्ही सांगाल त्याप्रमाणे तो दोन्ही हात पसरतो, हसतो व आशीर्वाद देतो यावेळी तो बायबलमधील ओळी वाचतो. ईश्वराचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तो तुमचे रक्षण करेल असेही सांगतो.

Leave a Comment