झेडटीईचा प्रिमियर नूबिया झेड १७ स्मार्टफोन लाँच


झेडटीईने त्यांच्या नूबिया सिरीजमधील नवा प्रिमियर स्मार्टफोन नूबिया झेड १७ लाँच केला आहे. या फोनची खासियत आहे ती त्याचा ड्युल कॅमेरा, ८ जीबी रॅम व स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये सादर केला गेला आहे. पैकी ६ जीबी रॅम व ६४ जीबी इंटरनल मेमरीसाठी २६ हजार, ६ जीबी रॅम,१२८ जीबी मेमरीसाठी ३२ हजार तर ८ जीबी रॅमसाठी ३७ हजार रूपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.

अन्य फिचर्समध्ये या फोनसाठी ५.५ इंची स्क्रीन, बॅकसाईडला २३ व १३ एमपीचा ड्युल कॅमेरा, टू एक्स झूम व १० एक्स डायनामिक झूमसह दिला गेला आहे तर १६एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. अँड्राईड नगेट ७.१ ओएस आहे व ३२०० एमएएचची बॅटरी दिली गेली आहे. हा फोन एनएफसी, जीपीएस, यूएसबी टाईप सी पोर्टला सपोर्ट करतो.

Leave a Comment