केवळ पैशाने विकत घेता येत नाही ही कार


आजकाल जगात पैशाने सर्व वस्तू खरेदी करता येतात व पैशाच्या जोरावर आपली स्वप्ने पुरी करता येतात. मग हा पैसा तुम्ही कोणत्या मार्गाने व कसा मिळवला याच्याशी जगाला कांहीच देणेघेणे नसते. मात्र यालाही अपवाद आहे बरं का!. तुमच्याकडे कितीही पैसा असला तरी तुम्ही ही प्रसिद्ध कार केवळ पैशांवर खरेदी करू शकत नाही तर ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला जगात मान्य अशी प्रतिष्ठाही असायला हवी अशी कंपनीची अट आहे. लक्झरी कार अशी ओळख असलेली रोल्स राईस ही ती कार आहे.

ही कार विकत घेण्यासाठी केवळ किंमत मोजून भागत नाही तर तुमची समाजात चांगली इमेज असणेही बंधनकारक आहे. यामुळे भारतीय अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला हि कार विकत घेता आली नाही असेही समजते.एखाद्या ग्राहकाने कारची मागणी नोंदविली की ती विकण्यापूर्वी ग्राहकाचा प्रोफाईल कंपनीकडून तपासला जातो. तुम्ही उद्योजक आहात, कलाकार आहात अथवा कोणत्या क्षेत्रात तुमची विशिष्ठ ओळख आहे, तुम्ही कुठे राहता, कायद्याच्या दृष्टीकोनातून तुमचे रेकॉर्ड कसे आहे म्हणजे तुमच्यावर कोणताही गुन्हा तर दाखल नाही ना याची सर्व माहिती मिळविली जाते व तुमचे रेकॉर्ड सर्व दृष्टींनी समाधानकारक असेल तरच तुम्हाला ही कार विकली जाते असे समजते.

Leave a Comment