मुंबईकराने शोधले केसगळतीवर हिट फॉर्म्युला


मुंबई : दोन मुंबईकरांनी वाढती केसगळती रोखणारा एक हिट फॉर्म्युला शोधून काढला असून या डॉक्टरांना या फॉर्म्युल्यासाठी अमेरिकेचे पेटंट मिळाले असल्यामुळे चर्चा तर होणारच. या फॉर्म्युल्याचे नाव ‘QR 678’ असे आहे. हे औषध लवकरच बाजारात येणार आहे. डॉ. देबराज शोम आणि डॉ. रिंकी कपूर यांनी २००८ मध्ये शोधलेल्या या फॉर्म्युल्याचे पेटंट मिळवले आहे.

मुंबईकरांची ओळख जिथे जातील तिथे नाव वर काढतील अशी आहे. हे दोन मुंबईकर डॉक्टर केस गळतीच्या समस्येने हैराण असणाऱ्यांसाठी देवदूत ठरले आहेत. वैयक्तिकरित्या संशोधन करणाऱ्या डॉक्टरांना अमेरिकेचे पेटंट मिळणे ही दुर्मिळ बाब आहे. या फॉर्म्युल्याची पहिली क्लिनिकल चाचणी झाली आहे. या संशोधनाचा अहवाल लवकरच एका टॉप मेडिकल जर्नलला देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. शोम यांनी दिली. डॉ. शोम सैफी रुग्णालयात फेशिअल प्लास्टिक सर्जन आहेत तर डॉ. कपूर कॉस्मेटिक डर्माटॉलॉजिस्ट असून ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या संचालक आहेत.

आम्ही केसांच्या वाढीसाठी पोषक ५ घटकांच्या कॉम्बिनेशनचा शोध लावला असून जे त्वचेतच असतात. मात्र त्यांची वाढ थांबलेली असते. त्यांची संख्या इंजेक्शन्सद्वारे वाढवली जाते आणि केसांची नैसर्गिक वाढ होते, असे डॉ. शोम यांनी ‘माय मेडिकल मंत्र’ला सांगितले. त्वचेतून QR 678 हे केसांच्या वाढीसाठी पोषक असणारे रेणू विशिष्ट पद्धतीने इंजेक्शनद्वारे उपलब्ध करून देता येतो, असे संशोधन या डॉक्टरांनी केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment