इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे ‘क्वीन ऑफ डार्क’


सध्या इंटरनेटवर दक्षिण सुदानची एक मॉडेल न्याकिम गॅटवेच धुमाकूळ घालत असून सोशल मीडियावर या मॉडेलचे फोटो व्हायरल होत आहेत. तिला क्वीन ऑफ डार्क म्हणून ओळखले जात आहे.

सध्या गोरे बनण्यासाठी विविध क्रिम बाजारात आहेत. अनेकांना गोरे होण्याची क्रेज असते. पण सुदानमध्ये या मॉडेलचा रंग एकदम काळा आहे, पण तिला या रंगाचा गर्व आहे. सुदानच्या या मॉडेलला सोशल मीडियावर क्वीन ऑफ डार्क अशी पदवी दिली आहे. तिने या पदवीबद्दल सर्वांचे आभार मानले आहे. तीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात ती म्हणाली, जगात प्रत्येक माणूस सुंदर असतो, आपला जो स्कीनचा कलर आहे, तो देवाने दिला आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल वाईट का वाटून घ्यावे.