मायक्रोमॅक्स YU यूरेका स्मार्टफोन लाँच


मुंबई – मायक्रोमॅक्स कंपनीने आपला नवा YU यूरेका ब्लॅक स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. ८,९९९ रुपये ऐवढी या स्मार्टफोनची किंमत असणार आहे. ५जूनपासून हा फोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध असणार आहे.

ब्लॅक कलरमध्ये YU यूरेका हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. शाओमी रेडमी ४ आणि कूलपॅड नोट ३ लाइट यासारख्या स्मार्टफोन्ससोबत YU यूरेका ब्लॅक स्मार्टफोनची टक्कर असणार आहे. YU यूरेका ब्लॅकमध्ये ५ इंचाची फुल एचडी स्क्रिन देण्यात आली आहे. रिझॉल्युशन (१०८०X१९२०) पिक्सल असणार आहे. यामध्ये ऑक्टाकोअर क्लॉकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये ४जीबी रॅम देण्यात आले असून ३२जीबी इंटरनल मेमरीही आहे. ही मेमरी मेमरीकार्डच्या सहाय्याने ६४जीबी पर्यंत वाढविता येऊ शकते.

YU यूरेका ब्लॅकमध्ये ड्युअल एलईडी फ्लॅशसोबत १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे तर ८ मेगापिक्सेलचा फ्रँट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फिंगरप्रिंट सेंसर होमबटण देण्यात आले आहे. YU यूरेका ब्लॅकमध्ये ३००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड ६.० मार्शमैलोवर चालतो. कनेक्टिव्हीटीसाठी या फोनमध्ये ४जी VoLTE सोबतच ब्ल्युटूथ, वाय-फाय, मायक्रो-यूएसबी आणि जीपीएस सारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment