४० हजार तरूणांना प्रशिक्षण देणार टाटा मोटर्स


नवी दिल्ली: स्किल डेव्हलपमेंटमध्ये औद्योगिक क्षेत्रात देशात आघाडीवर असलेली टाटा मोटर्स ही कंपनी नवे पाऊल टाकत असून सुमारे ४० हजार लोकांना टाटा मोर्टर्सकडून प्रशिक्षण देण्याचा विचार कंपनीच्या विचाराधीन आहे. हे लक्ष्य येत्या तीन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने बेरोजगार तरूणांना स्किल डेव्हलपमेंटसाठी टेक्निकल आणि वोकेशनल मॅन्युफॅक्चरिंग प्लांट,वेगवेगळ्या पातळीवरील नेतृत्व तेसच, सर्विस सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यास सुरूवात केल्याचे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

टाटा मोटर्सकडून देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणासाठी १०वी,१२वी पर्यंत शिक्षण झालेल्या तसेच, अर्ध्यातूनच शिक्षण सोडलेल्या तरूणांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. मोटार वाहन कौशल्य विकास परिषदेच्या (एएसडीसी) माध्यमातून कंपनीने हे प्रशिक्षण सुरू केले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर गजेंद्र चंदेल यांनी सांगितले की, टाटा मोटर्सच्या पुणे आणि जमशेदपूरच्या प्लांटमधून २०१८पर्यंत प्रतिवर्षी सुमारे ३०० ते ५०० लोक रिटायर होत असल्यामुळे या रिक्त जागा भरून काढण्यासाठी पहिल्यापासूनच तयार असायला हवे. याशिवाय बेरोजगार युवकांना ट्रेनिंग देऊन आम्ही स्किल इंडिया मिशनचाही एक भाग बनत आहोत. आम्ही येत्या तीन वर्षात सुमारे ३० ते ४० हजार लोकांना ट्रेनिंग देऊ. जेणेकरून हे तरूण प्रशिक्षण पूर्ण करून इंडस्ट्रीसाठी फायदेशीर राहतील.

Leave a Comment