रेल्वेचे तिकीट आता घ्या आणि १४ दिवसांनी पैसे द्या!


नवी दिल्ली: आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांसाठी तिकीट बुकींग संदर्भातील एक नवा पर्याय आणल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे तिकीट बुकींगसाठी आयआरसीटीसीने ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा आणली आहे. तुम्ही तिकीटाचे या सेवेमुळे पैसे नंतर पुढील १४ दिवसांमध्ये देऊ शकता. यामुळे तिकीट बुकींग दरम्यान येणा-या लांबलचक पेमेंट प्रोसेसमधून सुटका होणार आहे.

आयआरसीटीसीने ही सुविधा ई-पे लॅटरच्या सहयोगाने आणली असून तिकीट बूक केल्यानंतर १४ दिवसात कधीही तुम्हाला पेमेंट करता येईल. यासाठी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर जाऊन पेमेंट करावे लागेल. त्यानुसार तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केल्यास पुढील १४ दिवसांमध्ये तिकीटाचे पैसे भरू शकाल.

या सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड किंवा पॅनची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ज्यानंतर तुम्हाला तिकीट बूक करता येईल. दरम्यान यापूर्वीच आयआरसीटीसीने तिकिटासाठी कॅश ऑन डिलीव्हरी सेवा सुरु केली आहे. तिकीट बूक केल्यानंतर तुम्ही ते घरी मागवू शकता. त्यानंतर पेमेंट कार्ड किंवा कॅशद्वारे करु शकता.

Leave a Comment