लवकरच भारतीय बाजारात दाखल होणार नोकियाचे ३ धमाकेदार स्मार्टफोन


नवी दिल्ली – मोबाईल फोन बनविणा-यांपैकी प्रसिद्ध असलेली नोकिया कंपनी बाजारपेठेत नव्या रुपात पूनरागमन करत असून लवकरच भारतीय बाजारपेठेत नोकिया कंपनी आपले नवे स्मार्टफोन्स उपलब्ध करणार आहे.

काही दिवसांपूर्वीच नोकियाने नोकिया ६, नोकिया ५ आणि नोकिया ३ हे स्मार्टफोन लाँच केले होते. आता हे तिन्ही स्मार्टफोन्स भारतीय बाजारात उपलब्ध करण्याच्या तयारीत नोकिया असून हे फोन सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसतील असे असणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १५ जून रोजी हे स्मार्टफोन्स भारतीय बाजारात लाँच केले जाणार आहेत.

‘नोकिया ३’ या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक प्रोसेसर आहे. ५ इंचाची स्क्रीन, ७.० नॉगट सिस्टम, गूगल फोटोज अॅपमध्ये अनलिमिटेड क्लाऊड स्टोरेज, २जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोरेज, ८ मेगापिक्सेल रिअर आणि फ्रंट कॅमेरा, २६५०mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनची किंमत १०००० रुपये असण्याची शक्यता आहे.

‘नोकिया ५’ या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, २ जीबी रॅम, १६जीबी इंटरनल स्टोरेज, ३०००mAh क्षमतेची बॅटरी या फोनला देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत १५००० असण्याची शक्यता आहे.

‘नोकिया ६’ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, सोबत २.५ डी गोरिल्ला ग्लास, ४ जीबी रॅम, ६४जीबी इंटरनल स्टोरेज, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३०प्रोसेसर, १६मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ८मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची किंमत १८००० रुपये असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment