पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ


नवी दिल्ली: पेट्रोल प्रतिलीटर १.२३ रूपयांनी तर, डिझेलच्या दरात प्रतिलीटर ०.८९ पैशांची वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पाक्षिक बैठकीनंतर घेण्यात आला.

यापूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरात एक मे या दिवशी किरकोळ वाढ करण्यात आली होती. तेव्हा पेट्रोल १ पैसे प्रतिलीटर तर, डिझेल ४४ पैसे प्रतिलीटर या दराने वाढले होते. १६ एप्रिललाही पेट्रोल, किमतीत प्रतिलीटर १.३९ रूपयांनी तर, डिझेलच्या किमती प्रतिलीटर १.०४ रूपयांची वाढ करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किमती घसरल्याने तेल कंपन्यांनी भारतातही पेट्रोल, डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment