व्हॉट्सअॅपवरील ‘त्या’ लिंकवर चुकूनही करु नका क्लिक !


मुंबई: व्हॉट्सअॅप हे आजच्या घडीला जगातील सर्वात लोकप्रिय अॅप असून याचे अब्जावधी यूजर्स जगभरात असल्यामुळे फक्त चॅटींग करणे एवढ्यापुरता आता व्हॉट्सअॅप मर्यादित राहिलेले नसून आजकाल अनेकजण यात अनेक डाक्युमेंटही शेअर करतात.

पण व्हॉट्सअॅपवर एक मेसेज गेल्या काही दिवसापासून फिरतो आहे. तुमचे व्हॉट्सअॅपचे सब्सक्रीप्शन संपले आहे, तुमचे अकाउंट व्हेरिफाय करुन आयुष्यभरासाठी याचे सब्सक्रीप्शन ०.९९ पाउंडमध्ये खरेदी करा. यासोबतच तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. पण तुम्ही या लिंकवर चुकूनही क्लिक करु नका. हा एक व्हायरस असून यावर क्लिक केल्यानंतर हॅकर्सकडे तुमचा संपूर्ण पर्सनल डेटा जातो. असे झाल्यास तुमच्या बँक आणि पेमेंट डिटेलसह सर्वच पर्सनल डेटाही चोरी होण्याची शक्यता आहे.

ट्विटरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप यूजर्स याबाबत सावध करत आहेत. या ट्विटमध्ये सल्ला देण्यात आला आहे की, असा मेसेज आल्यास तात्काळ डिलीट करा. त्या लिंकवर अजिबात क्लिक करु नका. नुकताच जुडी या मालवेअरने अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये शिरकाव केला होता. यानंतर गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून जवळजवळ ४० हून अधिक अॅप हटवले आहेत. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याविषयी योग्य माहिती जाणून घ्या.

Leave a Comment