अमूलचा इस्रोसोबत सामंजस्य करार


मुंबई : इस्रोसोबत गुजरात कॉऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली असून इस्रो या करारानुसार अमूलला वैरण (चारा) लागवड क्षेत्र निर्धारणासाठी उपग्रहीय देखरेख आणि अंतराळ तंत्रज्ञानाची मदत करणार आहे. अमूल या ब्रँडच्या नावाखाली फेडरेशनकडून आपली उत्पादने बाजारात उपलब्ध केली जातात.

इस्रो सामंजस्य कराराच्या मदतीने ग्रामीण स्तरावरील धान्य पीक आणि चारा पिकाची ओळख पटविण्यास मदत करणार आहे. तसेच गावांमधील लागवडयोग्य परंतु शेती होत नसलेल्या जमिनींची माहिती याद्वारे उपलब्ध केली जाणार आहे. याआधी अमूल आणि इस्रोच्या स्पेस ऍप्लिकेशन सेंटरने संयुक्तपणे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविला होता. त्यावेळी जिल्हा आणि ग्रामीण स्तरावर हिरव्या चा-याची उपलब्धता होऊ शकते असे दिसून आले होते. डेअरी क्षेत्रातील भागीदारांद्वारे चाऱयाचे लागवड क्षेत्र वाढवून त्याची पाहणी आणि नियोजन करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा लाभ होऊ शकतो.

Leave a Comment