रेशमाच्या रेघांनी….घालवा बहिरेपणा


कानाच्या आजारांनी तसेच कानाचा पडदा फाटण्यासारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खुषखबर! कानांची श्रवणक्षमता पुन्हा मिळविण्यासाठी आणि त्यात सुधार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पहिल्यांदाच रेशमाच्या किड्यांचा वापर केला आहे.

आता शास्त्रज्ञ कानाचा पडदा फाटण्यासारख्या त्रासदायक समस्या दूर करण्याच्या दिशेने तसेच ऐकण्याची क्षमता पुन्हा आणण्याच्या दिसेने वेगाने काम करत आहेत. अन् यासाठी त्यांनी मदत घेतली आहे रेशमाच्या किड्याची. या किड्याच्या मदतीने शास्त्रज्ञांनी क्लियरड्रम नावाचे एक छोटेसे उपकरण बनविले आहे. हे उपकरण दिसण्यात आणि आकारानेही काँटॅक्ट लेन्ससारखेच आहे.

ईयर सायन्स इन्स्टिट्यूट ऑस्ट्रेलिया या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. मार्कस एटलस यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे साध्य केले आहेत. या चमूने सिल्क इम्प्लान्ट बनविला आहे. त्यावर रुग्णाच्या स्वतःच्या पेशी वाढू शकतात आणि त्यामुळे कानाचा पडदा सुधारतो. या इम्प्लान्टच्या अनेक वर्षे चाचण्या घेण्यात आल्या. त्यातून कानाच्या मूळ पडद्याच्या तुलनेत या इम्प्लान्टचे कार्य अधिक चांगले दिसून आले.

क्रॉनिक मिडल ईयर डिसीज आणि कानाचा पडदा फाटणे यांसारख्या समस्यांनी जगात लाखो लोक त्रस्त आहेत. हा त्रास होणाऱ्या लोकांची ऐकण्याची क्षमता प्रभावित होते, तसेच संक्रमणासारख्या गुंतागुंतीही निर्माण होतात. यामुळे जगभरात दर वर्षी 30,000 लोकांचा मृत्यू होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment