नोकियाच्या आगामी नोकिया ९ ची माहिती लिक


नवी दिल्ली: एचएमडी ग्लोबलसोबत नोकिया या लोकप्रिय कंपनीने मोबाईल बाजारात पुनरागमन केले असून ग्राहकांमध्ये नोकियाच्या नव्या स्मार्टफोनची मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे. पण सध्या नोकियाच्या आगामी एका जबरदस्त स्मार्टफोनची माहिती लिक झाली आहे. नोकियाच्या या स्मार्टफोन फोनचे नाव नोकिया ९ असेल, अशी चर्चा आहे. या स्मार्टफोनची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

बेंचमार्क वेबसाईटवर ‘अननोन हार्ट’ या कोडसह नोकियाचा हा नवा स्मार्टफोन दाखवण्यात आला आहे. यापूर्वी लाँच झालेले नोकिया ३ आणि नोकिया ५ हे स्मार्टफोन हार्ट या कोडनेमसह स्पॉट करण्यात आले होते. नोकियाचा हा नवा स्मार्टफोन सगळ्याच बाबतीत वरचढ असणार असल्याचे बोलले जात आहे.

८ जीबी रॅम या फोनमध्ये असेल अशीही चर्चा आहे. असे झाल्यास ८ जीबी रॅम असणारा हा जगातील पहिलाच स्मार्टफोन असेल. त्यासोबतच या फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा आणि ८.७ इंच आकाराची स्क्रीन असेल, असा दावाही काही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वी लीक झालेल्या एका माहितीनुसार या फोनमध्ये ५.५ इंच आकाराची स्क्रीन आणि ६ जीबी रॅम असेल, असा दावा करण्यात आला होता.

या फोनचा बॅटरी आणि कॅमेरा खास वैशिष्ट्य असण्याची शक्यता आहे. कारण या फोनमध्ये २२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असेल, असा दावा करण्यात आला आहे. तर क्विक चार्जिंग ४.० सपोर्टसह ३८००mAh क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment