आकर्षक लूक आणि वाजवी दरात जेब्रॉनिक्सची ‘समर साउंड-होप’ साउंड सिस्टिम


नवी दिल्ली: आपली ‘समर साउंड-होप’ ही साउंड सिस्टिम आईटी उपकरण, ऑडिओ, व्हिडीओ आणि सर्विलांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली भारतातील कंपनी जेब्रॉनिक्सने लाँच केली आहे. ही लिमिटेड एडिशन असून यात आधुनिक डिजाईन आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा उत्तम मेळ साधण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्यामुळे तुम्हाला मल्टी-डायमेंशनल साउंडची अनुभूती मिळते.

जेब्रोनिक्सने मार्केटमध्ये २.१ आणि ४.१ असे दोन साउंड उतरवले असून या मल्टीमीडिया स्पीकर्सचा लूक अत्यंत आकर्षक आहे. तसेच याची किंमत देखील वाजवी आहे. यात ४० वॉट्स आरएमएस, सब-वूफरसाठी १२.७ सेमी बेस ड्राइवर यात आहे. यात संगितातील बारीक बिटचा देखील स्पष्ट आवाज ऐकू येतो. तसेच हे एक स्पेशल एडिशन आहे जे समर म्युझिकसाठी लाँच करण्यात आले आहे.

या स्पीकरमध्ये यूएसबी आणि एसडी कार्डचा वापर देखील करता येणार आहे. उबर-कूल प्ले एंड प्लग सोबतच स्पीकरला दुस-या डिवाईसलादेखील विना केबल जोडता येऊन प्ले करता येणार आहे. सोबतच या स्पीकरला १ वर्षांची वारंटी देखील देण्यात आली आहे. भारतातील सर्व प्रमुख दुकानात हे स्पीकर उपलब्ध राहणार आहे. २.१ या स्पीकरची किंमत २९२९ रुपये आहे, तर ४.१ या स्पीकरची किंमत ३४३४ रुपये ऐवढी ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment