इस्रोचा सर्वात शक्तिशाली अग्निबाण चाचणी उड्डाणसाठी सज्ज


श्रीहरीकोटा – चाचणी उड्डाणसाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला आजवरचा सर्वात शक्तिशाली अग्निबाण सज्ज होत असून ही चाचणी यशस्वी झाल्यास त्याच्या साह्याने भारतीय भूमीवरून पहिला भारतीय अंतराळवीर अंतराळात पाठविणे शक्य होईल. या चाचणीनंतर भारत रशिया, अमेरिका आणि चीन नंतर अवकाशात मानवासह अंतराळवारी करणारा चौथा देश बनेल.

सतीश धवन अंतराळ तळाच्या लॉन्चपॅडवर पूर्ण वाढ झालेल्या २०० आशियाई हत्तींएवढे म्हणजे ६४० टन एवढे वजन असलेले ‘जिओरिंक्रोनस सॅटेलाईट लाँच व्हिएकल मार्क-३’ (जीएसएलव्ही-एमके-३) अशा नावाचा हा अग्निबाण आणून उभा करण्यात आला असून ‘इस्रो’चे अभियंते तो उन्हाळ्यातही पहिल्या चाचणी उड्डाणासाठी सज्ज करत आहेत.

याबाबत माहिती देताना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) चे चेअरमन ए. किरण कुमार म्हणाले, या नवीन, पूर्णपणे स्वावलंबी भारतीय बनावटीचे अग्निबाणाची पहिली यशस्वी चाचणी घेण्याच्या खटपटीत आम्ही आहोत. अशी किमान सहा चाचणी उड्डाणे यशस्वी झाली तर पुढील दशकभरात हाच अग्निबाण वापरून भारतीय भूमीवरून भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठविणेही शक्य होणार आहे.

जीएसएलव्ही-एमके तिसरा (आधी नाव असलेले लॉन्च व्हेकल मार्क -३) आणि त्यानंतरच्या फ्लाइट्सच्या सर्वप्रथम प्रक्षेपणानंतर हा अग्निबाण भारतातील भारतीय अग्निबाणाचा वापर करून भारतीय अंतराळात प्रक्षेपित करण्यासाठी भारताच्या वाहनाचा पर्याय असू शकतो, असे ही ते पुढे म्हणाले. अशा अग्निबाणांच्या साह्याने पृथ्वीच्या कमी कक्षेत ८ टनापर्यंतचे उपग्रहही भूस्थिर कक्षेत नेऊन सोडणे शक्य होईल, त्यामुळे भारतीय क्रू मंडळाला चालना देण्यासारखे आहे. मानवी अंतराळवारीखेरीज अधिक मोठे उपग्रह अंतराळात सोडण्याच्या दृष्टीनेही या प्रकारचा अग्निबाण भारताच्या दृष्टीने मोलाचा ठरेल.

Leave a Comment