नवी दिल्ली : एक्सई सेडानच्या पेट्रोल वेरियंट मॉडेलच्या किमतीत जॅग्वार लँड रोव्हरने कपात केली आहे. आपल्या नव्या पेट्रोल वर्जन किमतीत जॅग्वार लँड रोव्हरने २ लाख ६५ हजारांची कपात केली आहे.
स्वस्त झाली जॅग्वार एक्सईची पेट्रोल वेरियंट कार
२.० लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या माध्यमातून २०० पीएस पॉवर आणि ३२० एनएमचा टार्क निर्माण करता येणार आहे. ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले असून, याच्या माध्यमातून पुढील चाकांना पॉवर सप्लाय केला जाऊ शकतो. ० ते १०० किमी प्रतितासच्या वेगाने ७.७ सेकंदाचा कालावधी लागेल. या गाडीचा टॉप स्पीड २३७ किमी-प्रतितास एवढा आहे.