वनप्लस ३टी ची भारतातील विक्री बंद?


नवी दिल्ली : वनप्लस कंपनी सर्वात यशस्वी असा स्मार्टफोन वनप्लस ३टीची भारतातील विक्री बंद करण्याची शक्यता असून यासंदर्भात याआधी चर्चा सुरु झाल्या होत्या, कंपनीने त्यावेळी या चर्चा फेटाळल्या होत्या. पण आता कंपनीनेच वनप्लस ३टी स्मार्टफोनची भारतातील विक्री बंद करण्याचे संकेत दिली आहेत.

वनप्लस कंपनीचा सर्वात यशस्वी स्मार्टफोन म्हणून वनप्लस ३टी हा स्मार्टफोन गणला जात आहे. वनप्लस कंपनीचे कर्मचारी स्टिव्हन जी स्टेट्स यांनी ही पोस्ट फोरमवर शेअर केली असून या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, वनप्लस ३टी चे हँडसेट आऊट ऑफ स्टॉक होण्याआधी हा स्मार्टफोन खरेदीसाठी ही शेवटची संधी आहे. दरम्यान फोनअरीनाच्या वृत्तानुसार, वनप्लसने सांगितले आहे की, एक जूनपासून वनप्लस ३टी इंग्लंडसह युरोपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार नाही.

Leave a Comment