आता ‘तेजस’मध्येही मिळणार जेवण


मुंबई – प्रवाशांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे बोर्डाच्या टुरिझम आणि केटरिंग विभागाने भारतीय रेल्वेची आधुनिक ओळख बनत असलेली मुंबई-करमाळी (गोवा) सुपरफास्ट ‘तेजस’ एक्स्प्रेसमध्ये आता जेवणही पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना ही सुविधा आयआरसीटीसीच्या वतीने पुरण्यात येणार आहे.

दरम्यान, अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज असलेली मुंबई-करमाळी (गोवा) सुपरफास्ट तेजस एक्स्प्रेस प्रवाशांच्या सोयीची आहे. तेजस एक्स्प्रेसचे पुढील चार-पाच दिवसांचे आरक्षणदेखील त्यामुळे फुल्ल आहे. परंतु बेशिस्त प्रवाशांमुळे तेजसमध्ये सुविधांचा बोजवारा उडाला. प्रवाशांनी आसनांखाली फेकलेले उष्टे खाद्यपदार्थ तसेच बायो शौचालयांचा केलेला गैरवापर यामुळे तेजसमध्ये अस्वच्छता व दुर्गंधी पसरली.

तेजसमध्ये मोफत वाय-फाय, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी स्वतंत्र एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. मात्र मुंबई ते करमाळी हा प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी एलईडी स्क्रीनसह दिलेल्या ‘हेडफोन्स’वर डल्ला मारल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. प्रवाशांनी अनेक आसनांखाली उष्टे खाद्यपदार्थ आणि तत्सम फेकलेल्या वस्तूंमुळे गाडी कमालीची अस्वच्छ झाली होती. संपूर्ण ट्रेन वातानुकूलित असल्यामुळे हा वास अधिकच पसरला.

Leave a Comment