मुंबई : शुक्रवारी एक आधुनिक फिचर्ससहीत स्कुटर बीएमडब्ल्यू मोटर्राडने लॉन्च केली असून यामध्ये असलेला रिव्हर्स गिअर हे या स्कुटरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या टू व्हिलरची आकर्षक डिझाईनकडे सहजच ग्राहकांचे लक्ष वेधून घेईल. या स्कुटरमध्ये डिजिटल कनेक्टिव्हिटीही देण्यात आली आहे.
बीएमडब्ल्यूने आणली रिव्हर्स गिअरवाली ‘फ्युचर स्कुटर’
दोन रंगांच्या कलर डिझाईनसोबत बीएमडब्ल्यू मोटर्राड कॉन्सेप्ट लिंक स्कुटर दिसते. यामध्ये दोन आयकॉनिक एलईडी फ्रंट लाईटसही आहेत. या स्कुटरमध्ये अॅडजस्टेबल सीट देण्यात आली आहे. सोबतच स्टोअरेजसाठी लगेज कंपार्टमेन्टही देण्यात आले आहे. स्पीड, नेव्हिगेशन आणि बॅटरी संबंधित माहिती समोर दिसते. इतर माहितीसाठी वेगळे पॅनल देण्यात आले आहे. हे टच सेन्सिटिव्ह असल्यामुळे इन्फोटन्मेंट, कनेक्टिव्हिटी आणि रुटिंग इन्फॉर्मेशन कंट्रोल सहज केले जाऊ शकते.