वोडाफोन केवळ १९ रुपयात देणार मोफत कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा


दूरसंचार क्षेत्रात वाढत चाललेली स्पर्धा पाहता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी व्होडाफोन इंडियाने नव्या डेटा प्लॅनची घोषणा केली आहे. आपल्या ग्राहकांसाठी व्होडाफोन इंडिया कंपनीने एक नवी आणि अतिशय आकर्षक ऑफर बाजारात आणली आहे. एक दिवसाचे आणि एक आठवड्याचे असे विविध प्लॅन व्होडाफोनने बाजारात आणले आहेत.

दोन कॅटेगरीजमध्ये तीन प्लॅन्स व्होडाफोनने उपलब्ध केले आहेत. १९ रुपयांपासून याची किंमत सुरु होत आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटा दोघांचाही समावेश आहे.

१९ रुपयांच्या प्लॅनची वैधता १ दिवसाची असणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना व्होडाफोन क्रमांकाना पूर्णपणे मोफत कॉल करता येणार आहे. तर, १०० एमबी ४जी इंटरनेट डेटा देण्यात येणार आहे.

४९ रुपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना सात दिवसांसाठी व्होडाफोन मोफत लोकल आणि एसटीडी कॉलिंग देणार आहे. याशिवाय २५०एमबी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे. अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगबरोबरच ४जी इंटरनेट डेटा दिला जाणार आहे.

यानंतर सर्वात मोठा प्लॅन हा ८९ रुपयांचा असून या प्लॅनमध्ये ४९ रुपयांच्या प्लॅन एवढ्याच सुविधा देण्यात येणार आहेत. त्याशिवाय व्होडाफोन सोडून इतर क्रमांकांना कॉल करण्यासाठी १०० मिनिटांचा टॉकटाईम देण्यात आला आहे. हे सर्व प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध असून ते ग्राहकांना ऑनलाईन, व्होडाफोन स्टोअर आणि रिटेल स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.

Leave a Comment