पेट्रोल पाच वर्षात ३० रूपये लिटर?


अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीमधील उद्योजक व फ्युचरिस्ट टोनी सेबा यांनी येत्या पाच वर्षात पेट्रोलचे दर लिटरला ३० रूपयांपेक्षाही खाली येतील असा दावा केला आहे. सध्या भारतात पेट*ोलचे दर ६५ ते ७२ रूपये दरम्यान आहेत. मात्र २०२२ सालापर्यंत हे दर बॅरलला २५ डॉलर्सपर्यंत घसरतील असे सेबा यांचे म्हणणे आहे. संपूर्ण जगातच पेट्रोलवरचे अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयोग केले जात आहेत.त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर, इंधनाचे अन्य पर्याय, इलेक्ट्रीक कार्स यांचा यशस्वी वापर केला जात आहे.

सोबा यांच्या मते सेल्फ ड्रायव्हिंग कारची वाढती मागणी हे तेलाचे भाव उतरणार याचे मुख्य कारण असेल. सेबा यांनी कांही वर्षांपूर्वी जगभर सोलर पॉवरची मागणी वाढणार असल्याचे भाकित केले होते आणि आज ते तंतोतंत खरे ठरले आहे. सेबा स्वतः क्लिन एनर्जीचे इन्स्ट्रक्टर आहेत. विशेष म्हणजे भारताचे उर्जामंत्री विजय गोयल यांनीही भारतात २०३० पर्यंत इलेक्ट्रीक कार्सचा वापर नियमित केला जाईल असे सांगितले आहे याचाच अर्थ आणखी १०-१२ वर्षात भारतातही पेट्रोलची मागणी घटलेली असेल व त्याचाही परिणाम दरकपातीवर होणार आहे.

Leave a Comment