भारतात लाँच झाली फॉक्सवॅगनची टिगुआन


नवी दिल्ली: आपली बहुचर्चीत प्रीमियम एसयूव्ही टिगुआन कार कार उत्पादक कंपन्यांमध्ये आघाडीवर असलेली जर्मन कंपनी फॉक्सवॅगनने भारतात लाँच केली असून गेली बरेच दिवस या कारची चर्चा होती. भारतीयांच्या भेटीला अखेर टिगुआन आली आहे. टिगुआनची दिल्लीतील एका शोरूममध्ये किंमत २७.९८ लाख रूपये ऐवढी सांगितली जात आहे.

एमक्यूबी प्लॅटफ़ॉर्मवर आधारीत जर्मन बनावटीची ही कार असून टिगुआनमध्ये दोन लिटर क्षमतेचे (२०००सीसी) डिझेल इंजिन आहे. याबाबत माहिती देताना फॉक्सवॅगन ग्रुप्स सेल्सचे भारतातील मुख्य अधिकारी थिएरी लेस्पिएकने सांगितले की, जगभारत एक मजबुत आणि अत्यंत सुंदर कार म्हणून टिगुआनने आपली ओळख बनवली आहे. आम्हाला जगप्रसिद्ध असलेली ही कार भारतात लाँच केल्याचा प्रचंड आनंद आहे. टिगुआन ही अत्यंत सुरक्षित, लग्जरी आणि आरामदायी कार आहे, असेही इएरी लिस्पिएक म्हणाले.

देशातील फॉक्सवॅगनच्या सर्व शोरूममध्ये टिगुआन ही कम्फर्टलाईन आणि हाईलाऩ अशा दोन प्रकारात उपलब्ध असणार आहे. दिल्लीतील एका शोरूममध्ये ही कार ३१.३८ लाखाला असल्याचेही सांगितले जात आहे. फॉक्सवॅगनने टिगुआनला आंतरराष्ट्रीय पातळीवर २००७मध्ये पहिल्यांदा लाँच केले होते. ही कार जगभरातील अनेक प्रमुख राष्ट्रांमध्ये विकली जात आहे.

Leave a Comment