१२ पासही करू शकतात भारतीय नौदलात अर्ज


नवी दिल्ली: भारतीय नौदलात मेगा भरती निघाली असून, विहीत नमुन्यात सांगितल्याप्रमाणे अर्ज इच्छुक तरूणांनी करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय नौसनेच्या सीनिअर सेकंडरी रिक्रूट एसएसआर फेब्रुवारी २०१८च्या बॅचसाठी ही भरती असणार आहे.

या नोकरीसाठी ४ जून २०१७ ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख असून भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ फेब्रुवारी १९९७ ते ३१ जानेवारी २००१ दरम्यान, झालेला असावा. तसेच तो अविवाहीत असावा. उमेदवार हा गणित, फिजिक्स, किंवा केमेस्ट्री, बायोलॉजी, कॉम्प्यूटर सायन्स आदी विषयांतून कमीत कमी ६० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेला असवा. प्रशिक्षण कालावधीत ५७०० रूपये वेतन आणि प्रतिमहिना स्टायफंड दिला जाईल. प्रशिक्षण कालावधी संपल्यावर ५२०० ते २०००० सोबत ग्रेड पे २००० एवढे मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा, शारीरिक तंदुरूस्ती आणि शारीरिक परिक्षेवर आधारित असेल. अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम www.nausena-bharti.nic.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागेल. मात्र, लक्षात ठेवा की, अर्ज करण्यापूर्वी संदर्भासाठी आपल्याला १०वी पास तसेच १२पासचे गुणपत्रक सोबत ठेवावे लागेल. तसेच इमेल आयडीही द्यावा लागेल. https://www.joinindiannavy.gov.in वर जाऊनही तुम्हाला अर्ज भरता येऊ शकेल.

अधिक माहिती साठी येथे क्लिक करा.

Leave a Comment