बीएसएसएलची सॅटेलाईट फोन सेवा


सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल व इन्मारसॅट यांनी परस्पर सहकार्यातून भारतीयांसाठी फोनसेवेचे नवे प्रवेशद्वार खुले केले आहे. इन्मारसॅटच्या चौथ्या जनरेशन सॅटलाईटच्या मदतीने बीएसएनएल सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील ग्राहकांना सॅटलाईट फोन सेवा देणार आहे. बीएसएनएसलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी सांगितले की डिजिटल इंडिया मोहिमेचे लक्ष्य गाठण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. ही कनेक्टिव्हीटी टप्प्याटप्प्याने संपूर्ण देशभरातील ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याचे काम करेल.

रक्षा, व्यापार क्षेत्र, उद्योंग, समुद्री उद्योग तसेच दुर्गम भागासाठी ही सेवा अतिशय सुरक्षित व भरवशाची आहे.इन्मारसॅटकडे १४ उपग्रहांचा समूह आहे. जेथे कुठलेच नेटवर्क पोहोचू शकत नाही तेथे या सेवेमुळे बीएसएनएल पोहोचू शकणार आहे. सध्या टाटा कम्युनिकेशन ही आधुनिक सॅटेलाईट सेवा देत आहे मात्र त्याची मुदत ३० जूनला संपते आहे. त्यानंतर बीएसएनएल च या क्षेत्रात सेवा देणार आहे.

Leave a Comment