बिटकॉईनची किंमत ७ वर्षात शेकडो पटींनी वाढली


रॅनसमवेअर सायबर हल्ल्यात हॅकरकडून बिटकॉईन्सच्या स्वरूपात खंडणी मागण्याचे प्रकार घडल्यानंतर ही व्हर्च्यूअल करन्सी पुन्हा चर्चेत आली आहे. क्रेडीट कार्ड देणारे, व अन्य थर्ड पार्टी सामान व सेवा खरेदी तसेच चलन देवघेव करणारे लोकही बिटकॉईनला प्राधान्य देऊ लागले असल्याचे दिसून आले आहे. गुंतवणुकीसाठी अतिशय फायदेशीर ठरलेली ही डिजिटल करन्सी त्यामुळेच चर्चेत आली आहे.

असे समजते जेव्हा या डिजिटल करन्सीची निर्मिती केली गेली तेव्हा तिचा भाव १० ते १५ पैसे इतका होता मात्र गेल्या सात वर्षात हाच भाव आता १ बिटकॉईनला दीड लाख रूपयांवर गेला आहे. सीएनबीसी चॅनल वर दिल्या गेलेल्या माहितीनुसार बिटकॉईनचे भाव गगनाला भिडण्यामागे जपानचे नवे नियम कारणीभूत ठरले आहेत. जपानने देशातील रिटेलरला बिटकॉईन घेण्याची मंजुरी दिली आहे. त्यामुळे व्यापार, उद्येागात बिटकॉईन व्यवहारात जपानचा वाटा ४० टकक्यांवर गेला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चितता तसेच सामान्य चलन बाजारातील उलाथापालथीचा थेट फायदा बिटकॉईनला मिळत असल्याचे जाणकारांचे मत आहे. छोटे व्यापारी, ऑनलाईन रिटेलर्सही बिटकॉईनचा पेमेंट ऑप्शन म्हणून स्वीकार करू लागले आहेत.

अर्थात तज्ञांच्या मते हा पैसा प्रत्यक्ष हातात कधीच येत नसल्याने व तो कल्पनेतला पैसा असल्याने त्यातील गुंतवणूक फायदेशीर वाटत असली तरी ती धोकादायक आहे.

Leave a Comment