फेसबुकच्या जन्मस्थळाला मार्कची १३ यर्षांनंतर भेट


फेसबुक या सोशल साईटचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने तब्बल १३ वर्षांनंतर प्रथमच फेसबुकच्या जन्मस्थळाला म्हणजे तो तरूणपणी जेथे शिकत होता त्या हॉर्वर्ड विद्यापीठातील त्याच्या हॉस्टेल रूमला भेट दिली. मार्क या विद्यापीठातील ड्राॅप आऊट विद्यार्थी होता असेही समजते.

मार्कने त्याच्या विद्यापीठातील हॉस्टेल रूमला भेट देताना तिथला लाइव्ह व्हिडीओ प्रसारित केला आहे. तो म्हणतो याच खोलीत त्याने प्रथम दफेसबुक नावाने ही साईट सुरू केली होती. आपल्या या भेटीबद्दल मार्क सांगतो, माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाच्या घटना येथे घडल्या आहेत. त्याची पत्नी प्रिसिला त्याला इथेच प्रथम भेटली होती.

मार्क विद्यापीठात पदवी समारंभात भाषण करणार आहे व येथेच त्याला त्याची हुकलेली पदवी मानद पदवी स्वरूपात प्रदान केली जाणार आहे.

Leave a Comment