अॅपल आयफोन नाईनची चर्चा सुरू


अॅपलचा आयफोन एट अजून बाजारात दाखल झालेला नसतानाच आयफोन नाईन बद्दलच्या बातम्या झळकू लागल्या आहेत. अॅपलचा आयफोन नाईन ओएलईडी स्क्रीनसह येणार असल्याचे सांगितले जात असून ५.२९ व ६.६४ इंची डिस्प्लेसह हा फोन येईल असे द इन्व्हेस्टर च्या अहवालात म्हटले गेले आहे. त्यासाठी अॅपल व सॅमसंग यांच्यात ओएलईडी स्क्रीन पुरवठा संदर्भात करण्यात आलेल्या कराराचा हवाला दिला गेला आहे.

अॅपलचा आयफोन एट सप्टेंबरमध्ये येणार आहे तर आयफोन नाईन २०१८ साली येईल अशीही अफवा आहे.अॅपलने ८० दशलक्ष ओएलइडी स्क्रीन पुरवण्यासंदर्भात सॅमसंगशी करार केला आहे. व त्यासाठी ५.२९ व ६. ४६ इंची स्क्रीनची मागणी केली आहे.नवा फोन ग्लास बॅक २.५ डी कर्व्ह ग्लास, व्हर्टीकल ड्युल कॅमेरा फिचर्स सह असेल असाही अंदाज वर्तविला जात असून अॅपल प्रथमच कर्व्हड ओएलइडी स्क्रीनचा वापर करणार आहे. या स्क्रीनचे सॅमसंग एकमेव सप्लायर आहेत. नवा फोन वॉटरप्रूफ व वायरलेस चार्जिंगसह असेल असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment