मुंबई : निश्चित अपेक्षेपेक्षा जास्त काही जिओ इंटरनेट वापरकर्त्यांना देत आहे. आता ४जी वापरणाऱ्यांसाठी जिओने एक नाही दोन नाही तब्बल १३ नवीन प्लान आणले आहेत. आतापर्यंत जिओच्या वेबसाईटवर ३ प्लान होते, त्यात आता आणखी १३ नवीन प्लान जोडण्यात आले आहेत.
जिओने आणले नवीन धमाकेदार प्लान
जिओचे नवीन प्लॅन अगदी १९ रुपयांपासून ४ हजार ९९९ रुपयांपर्यंत आहेत. यात जियो जुन्या किमतींमध्येच अधिकाधिक डाटा देणार आहे. जिओची धन धना धन ऑफर यापुढे केवळ जियो प्राइम यूझर्ससाठी उपलब्ध राहणार आहे. नॉन प्राइम यूझर्ज केवळ १९ रुपये ते १४९ रुपयांचे प्लान घेऊ शकणार आहेत.
इतर प्लान घेण्यासाठी त्यांना प्राईम मेंबरशिप घ्यावी लागणार आहे. धन धना धन ऑफर जाहीर करण्यापूर्वी तसे नव्हते. सर्वच प्रिपेड आणि पोस्टपेड प्लानमध्ये कॉलिंग, रोमिंग आणि मॅसेजिंग सेवा मोफत दिली जाणार आहे. जिओने प्रिपेड प्लान जाहीर करतानाच नव्या ३ पोस्टपेड प्लॅन्सची घोषणा केली आहे. यात ३०९, ५०९ आणि ९९९ असे प्लॅन आहेत. हे प्लॅन ३०३ आणि ४९९ च्या प्लानची जागा घेणार आहेत.