जगातील सर्वात मोठे विष्णुमंदिर- अंकोरवट


भारतात सर्वच देवांची असंख्य मंदिरे आहेत. एकापेक्षा एक सुरेख, भव्य मंदिरे येथे बांधली गेली आहेत. मात्र हिदूंचा प्रमुख देव विष्णु याचे जगातील सर्वात मोठे मंदिर भारतात नसून कंबोडियात आहे. अंकोरवट नावाने हे मंदिर जगप्रसिद्ध आहेच पण विष्णुचे अस्तित्वात असलेले हे सर्वात प्राचीन व भव्य मंदिर असल्याचेही सांगितले जाते.

कंबोडियातील या स्थानाचे मूळ नाव यशोधरपूर असे होते. सम्राट सूर्यवर्मन दुसरा याचे येथे ११ व्या शतकात राज्य होते व त्यानेच हे मंदिर बांधले आहे. फ्रान्सपासून कंबोडियाला स्वातंत्र मिळाल्यानंतर हे मंदिर ही कंबोडियाची ओळख ठरले. त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर हे मंदिर आहे. सम्राट सूर्यवर्मनने मिकांक नदीच्या काठी हे महाप्रचंड मंदिर बांधले. टाईम मॅगेझीनने जगातील पाच आश्चर्यात त्याची गणना केली आहे तसेच १९९२ साली युनेस्कोने जागतिक वारसा यादीत त्याचा समावेश केला आहे व गिनीज बुक मध्येही या मंदिराची नोंद झाली आहे.


या महाप्रचंड मंदिर समुहाची बांधणी वाळूच्या दगडातून केली गेली आहे व प्रत्येक दगड दीड टन वजनाचा आहे. मंदिराच्या भितींवर रामायण महाभारतातील कथा कोरल्या गेल्या आहेत व देव व दानवांत झालेले अमृतमंथनही येथे दगडातून चिरंजीव केले गेले आहे. या सुंदर मंदिराला भेट देण्यासाठी देशविदेशातून लाखो भाविक येत असतात. विशेष म्हणजे २०१६ मध्ये या मंदिराला भेट देणार्‍यांत चिनी पर्यटकांची संख्या सर्वाधिक म्हणजे ६ लाख ६७२८५ इतकी होती.

Leave a Comment