गांधींची खादी आता खादी बाय पिटर इंग्लंड


भारताच्या स्वातंत्र्ययुद्दात अहम भूमिका बजावलेली खादी आता नव्या स्वरूपात ग्राहकांसमोर येत आहे. म.गांधी यांनी चरख्यावर खादी सूत कातले आणि ब्रिटीश साम्राज्याविरोधात अहिंसा मार्गाने आंदोलन पुकारून देशाला स्वातंत्र मिळवून देण्याची मोठी कामगिरी बजावली होती. हीच खादी आता नव्या रूपात, खादी बाय पीटर इंग्लंड सादर केली जात आहे. आदित्य बिर्ला फॅशन तर्फे खादी उत्पादनांची नवी श्रेणी नवी डिझाईन्स सादर केली जात असून ही उत्पादने खादी ग्रामोद्योग बरेाबच पीटर इंग्लंड शो रूममध्येही उपलब्ध होत आहेत.

खादी फॅशन हाऊस व खादी ग्रामोद्योग आयोग व लघु मध्यम उद्योग मंत्रालयाने आदित्या बिर्ला फॅशन्स व रिटेल लिमिटेड बरोबर या संदर्भात करार केला आहे. त्या अंतर्गत हा ब्रँड सादर केला जाईल. खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना म्हणाले, खादी ही भारताचा वारसा आहे. म.गांधींनी त्याचा प्रचार केला व त्यामुळे ग्रामीण भागात कमी खर्चात रोजगार निर्मिती होण्यास हातभार लागला. आदित्य बिर्ला फॅशन्सबरोबरच्या करारामुळे दोन लाख रोजगार नव्याने निर्माण होणार आहेत. शिवाय खादीला प्रोफेशनल लूकही मिळेल.

आदित्य बिर्ला फॅशन्सचे बिझिनेस हेड आशिष दीक्षित म्हणाले, खादी ग्रामोद्योगबरोबर करार केल्याने आम्हाला खादी कपड्यांसंदर्भात नवीन शोध घेता येतील व बदलत्या फॅशन्सप्रमाणे त्यात बदल केले जातील.

Leave a Comment