स्पाईस जेटची धमाल ऑफर- १२ रू.तिकीट


स्पाईस जेटने त्यांच्या ग्राहकांसाठी कंपनीला १२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने १२ रूपयांत तिकीट बुक करण्याची धमाल ऑफर आणली आहे. अर्थात त्यासाठी कांही अटी घातल्या गेल्या आहेत. १२व्या वर्धापनदिन सेल या योजनेखाली कंपनीच्या वेबसाईटवरून ग्राहक १२ रूपये भरून आंतरराष्ट्रीय अथवा स्थानिक प्रवासासाठी विमानाचे तिकीट बुक करू शकणार आहेत. तिकीटावर सरचार्ज व टॅक्स वेगळा भरावा लागेल. २३ मे ते २८ मे या दरम्यान ग्राहकाला तिकीट बुक करता येणार आहे व २६ जून ते २४ मार्च २०१८ या काळात प्रवास करता येणार आहे.

१२ साल बडा धमाका या नावाने कंपनीचे फ्री तिकीट जिंकण्याची संधीही ग्राहकांना देऊ केली असून लकी ड्राॅ काढला जाणार आहे. तिकीट बुकींगची मुदत संपल्यावर हा ड्रो निघेल. आंतरराष्ट्रीीय तसेच स्थानिक विमान प्रवासासाठी प्रत्येकी १२-१२ ग्राहकांना संधी मिळणार आहेत. सेल काळात मोफत तिकीटाची संधी मिळणार आहे. अन्य बक्षीसात पुढच्या प्रवासाच्या वेळी बुकींग करताना १० हजार रूपयांचे हॉटेल व्हाऊचर तसेच १० किलो जादा सामान नेण्याची परवानगी दिली जाईल तसेच स्पाईस क्लब मेंबर सीट साठी १ हजार लॉयल्टी पॉइंटही मिळणार आहेत.