नॉर्वेतील डूम्स डे व्हॉल्ट, भविष्यातली बियाणे बँक


नैसर्गिक संकटे, युद्ध, जागतिक तपमान वाढ, पूर यामुळे जगभरातील पिके नष्ट होतील पर्यायाने धान्यांची बिजे उरणार नाहीत व धान्य न पिकल्यामुळे माणूस संकटात सापडेल व खायलाच कांही न उरल्याने मानव जात नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचेल ही शक्यता लक्षात घेऊन त्यावरची उपाययोजना केली गेली आहे. त्यासाठी वैज्ञानिकांनी २००८ मध्ये नॉर्वेच्या नॉर्थ पोल भागात डूम्स डे व्हॉल्ट उभारला आहे. नॉर्वेच्या स्वालबार्ड अक्रेपेलेगो भागात हा व्हॉल्ट जमिनीखाली १०० मीटर खोलात उभारला गेला आहे.

या व्हॉल्टला बुलेटप्रूफ दरवाजे असून मिसाईल आदळले तरी ते उघडू शकत नाहीत. आण्विक युद्ध झाले तरी त्यावर कोणताही दुष्परिणाम होऊ शकत नाही. कांही संकट ओढवले व पृथ्वीवरील सर्व पिके नष्ट झाली तर पुन्हा शेती सुरू करण्यासाठी या व्हॉल्टमध्ये जगभरातील बहुतेक देशांत पिकणार्‍या धान्यांची बिजे साठविली गेली असून ती त्यावेळी वापरली जाणार आहेत. या व्हॉल्टमध्ये जगातील ८ लाख ६० हजार प्रकारची बिजे साठविली गेली आहेत. मार्च २०१६ व मे महिन्याच्या दरम्यान यात मोठ्या प्रमाणावर बीजे ठेवली गेली असे समजते.

बिल गेटस फौंडेशन व अन्य देश, नॉर्व सरकार यांनी ६० कोटी रूपये खर्च करून महाविनाश स्थितीत उपयुक्त ठरेल अशी ही योजना राबविली असून त्यासाठी बर्फाच्या डोंगराखाली ४०० फूट लांबीचा काँक्रिटचा बोगदा बांधला गेला आहे. हा भाग नेहमीच बर्फाने झाकलेला असतो. वीज नसतानाही यात ठेवलेली बियाणे २०० वर्षे सुरक्षित राहू शकणार आहेत. ४५ लाख प्रकारची बिजे जतन करण्याची या व्हॉल्टची क्षमता आहे.

येथे बियाणी साठवून ठेवण्यासाठी उत्सुक असलेल्या जगातील कोणत्याही देशाला नॉर्वे सरकारशी एक करार करावा लागतो व खाताधारकाला डिपॉझिट भरावे लागते. ज्या देशांची बियाणे आहेत, त्याच देशांचा या बियाणांवर हक्क राहतो. येथे अमेरिकेच्या संसदेतील खासदार व यूएचे महासचिव यांनाच आत जाण्याची परवानगी दिली जाते.

Leave a Comment