फेसबुकवरुन आता घरबसल्या ऑर्डर करा जेवण


मुंबई – आपल्या युजर्ससाठी वेळोवेळी नवनवे फीचर्स लोकप्रिय सोशल नेटवर्कींग वेबसाइट फेसबुक लॉन्च करत असते. फेसबुक आता आणखी एक सेवा सुरू करणार असल्याची माहिती असून तुम्हाला आता घरबसल्या फेसबुकद्वारे आवडीचे जेवण ऑर्डर करता येणार आहे. या दिशेने गेल्यावर्षीच फेसबुकने पावले उचलायला सुरूवात केली होती. कंपनीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डिलीव्हरी डॉट कॉम आणि स्लाइससोबत बोलणी केली होती. ही सुविधा फेसबुक अॅप आणि वेब दोघांसाठी असणार आहे. सध्या अमेरिकेतील काही ठरावीक युजर्ससाठी ही सुविधा सुरू कऱण्यात आली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही सेवा भारतातही सुरू करण्यात येणार आहे.

Leave a Comment