हैदराबादमध्ये राहणाऱ्या १७ वर्षांच्या सिद्धार्थने ‘इलेक्ट्रोशूज’ नावाची चप्पल तयार केली आहे. या चप्पलचा रट्टा पडताच समोरच्या व्यक्तीला विजेचा तीव्र झटका बसतो. त्यामुळे महिला या चप्पलच्या साह्याने आपले रक्षण करू शकतात.
महिलांनो, छेड काढणाऱ्या रोमिओंना याच चप्पलचा मार द्या!
संपूर्ण देश दिल्लीच्या निर्भया प्रकरणाने हादरला होता. या घटनेचा निषेध करण्यासाठी छोटा सिद्धार्थ आपल्या आईसोबत एका मोर्चात सहभागी झाला होता. सिद्धार्थला त्यावेळीच महिलांच्या सुरक्षेसाठी एखादी वस्तू तयार करण्याची कल्पना सुचली. अनेक वर्षे त्याने यावर काम केले आणि ही चप्पल त्याच्या मेहनतीतून तयार झाली. ही चप्पल विशिष्ट तंत्र वापरून तयार करण्यात आली असून ही चप्पल चार्ज करण्याचीही गरज नाही. जितक्यावेळ ती पायात असेल तितकी ती चार्ज होत राहिल. समजा एखाद्याने महिलेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तर या चप्पलचा वापर करून ती आपले रक्षण करू शकते. सध्या सिद्धार्थ यावर आणखी काम करतो आहे. तो सध्या ही चप्पल स्वस्तात उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करत आहे.