वर्कआऊटमुळे येणारा घाम व उष्णता बाहेर टाकणारा सूट


एमआयटीच्या संशोधकांनी वर्कआऊट करणार्‍यांसाठी खास सूट तयार केला आहे. या वर्कआऊट सूटला उघडमीट करणार्‍या फ्लॅप दिल्या गेल्या असून त्या अॅथलेटच्या बॉडीमध्ये किती उष्णता निर्माण झाली आहे अथवा त्याला किती घाम येतो आहे त्यानुसार उघडझाप करतात. यामुळे अॅथलेटचे शरीर थंड राहण्यास मदत मिळते. त्यासाठी या सूटमध्ये जिवंत मायक्रोबायल पेशी घातल्या गेल्या आहेत.

एमआयटीमधील संशोधक वेन वाँग व त्यांच्या सहकार्‍यांनी हा सूट तयार केला आहे. ते म्हणाले, या सूटमध्ये घातलेले मायक्रोब सेन्सरप्रमाणे काम करतात. या पेशी आकसतात तसेच प्रसारणही पावतात. सूटवर अंगठ्याच्या नखापासून ते बोटाच्या लांबी एवढ्या आकाराचे फ्लॅप बनविले गेले आहेत. अॅथलेटला घाम येऊ लागला की हे फ्लॅप उघडतात व बॉडी तापमान नॉर्मल झाले की आकसतात. याच मायक्रोबच्या थर देऊन पळणार्‍यांसाठी बूटही तयार केले गेले आहेत. हे मायक्रोब स्पर्श झाला तरी अथवा अगदी माणसाच्या पोटात गेले तरी त्यांच्यापासून कोणताही धोका नाही. शरीर फार आर्द्र झाले तर हे मायक्रोब फ्लेारोसंट होऊन चमकतातही. हे संशोधन सायन्स अॅडव्हान्समध्ये प्रसिद्ध केले गेले आहे.

Leave a Comment