पेटीएम वॉलेट मधील पैशांवरही मिळणार व्याज


रिझर्व्ह बँकेने बँकेसाठीचा परवाना दिल्यानंतर भारतीय पेमेंट व कॉमर्स म्हणजे पेटीएमने २३ मे पासून त्यांचे पेमेंट बँक म्हणून व्यवहार सुरू केले आहेत. अन्य बँकांप्रमाणेच येथे अकांऊंट उघडता येणार आहे व त्याबदली पासबुक, डेबिट कार्ड, चेकबुक दिले जाणार आहे. विशेष म्हणजे पेटीएम मोबाईल वॉलेट असलेल्या लोकांना त्यांचे पैसे या पेमेंट बँकेत ट्रान्स्फर करण्याची सुविधा दिली गेली असून त्यावर सेव्हींग अकौंटप्रमाणे व्याज दिले जाणार आहे. तसे एसएमएस पेटीएमच्या २१ कोटी८० लाख लोकांना पाठविले गेले आहेत. अर्थात ज्यांना वॉलेटमधील पैसे सेव्हींग अकौंटला ट्रन्स्फर करायचे नाहीत त्यांना तशी परवानगीही दिली गेली आहे. कारण पेटीएम अॅप अकौंट न उघडणार्‍यांसाठी अथवा अकौंटधारकांसाठी सुरूच ठेवले जाणार आहे.

पेटीएम म्हणजे पे थ्रू मोबाईल. या कंपनीचे मुख्यालय नॉयडा येथे असून ही सुविधा ऑगस्ट २०१० ला लाँच झाली. वन ९७ कम्युनिकेशन ही तिची पेरंट कंपनी. २०१५ मध्ये चीनी ई कॉमर्स अलिबाबा ने तिच्यात ६२५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. परदेशी गुंतवणूक मिळविणारी ही पहिली भारतीय कंपनी.त्यांनंतर या कंपनीत तैवानच्या माऊंटटेन कॅपिटलनेही गुंतवणूक केल्यानंतर कंपनीचे भांडवल ५ अब्ज डॉलर्सवर गेले व येथे १३ हजार पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. कंपनीशी ३० लाख व्यापारी ऑनलाईन जोडलेले आहेत. मार्च २०१७ मध्ये कंपनीने कॅनडात बिल पेमेंट सर्व्हीस लाँच केली असून हा कंपनीचा पहिलाच परदेश विस्तार आहे.

Leave a Comment