नासाकडून कलाम यांचा सन्मान- बॅक्टेरियाला दिले कलाम यांचे नांव


अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने, नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये शोधलेल्या एका बॅक्टेरियाला भारताचे माजी राष्ट्रपती व भारतीय अंतराळ वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांचे नांव देऊन त्यांना सन्मान दिला आहे. हा बॅक्टेरिया फक्त अंतराळातच सापडतो. पृथ्वीवर नाही. जेट प्रोपेल्शन लॅबोरेटरी अंातरग्रही प्रवास करताना हा बॅक्टेरिया अंतराळ स्थानकातील फिल्टरमध्ये शोधला असून हा फिल्टर अंतराळ स्थानकाच्या स्वच्छतेचा एक भाग आहे. हा बॅक्टेरिया ४० महिने फिल्टरच्या आत होता.

नासातील वैज्ञानिक डॉ. कस्तुरी वेंकटस्वर्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. कलाम यांनी १९६३ मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाची सुरवात नासा येथे केली होती. त्यानंतर त्यांनी केरळ मधील थुंबा या मच्छीमारी गावात भारताचे पहिले रॉकेट प्रक्षेपण केंद्र सुरू केले. कलाम यांच्या कतृत्वाला सलाम करताना अंतराळात सापडलेल्या सोलीबॅकिलस या बॅक्टेरियाचे नामकरण सोलीबॅकिलस कलामी असे केले गेले आहे.

Leave a Comment