लोंबार्गिनीची शक्तीशाली सेंटेनरियो अवतरली


लग्झरी कार मेकर लोंबार्गिनीने त्यांच्या संस्थापकाच्या जन्मशताब्दीनिमित्त पहिल्या अमेरिकन ग्राहकाला कंपनीच्या सर्वात शक्तीशाली एवेंटडोर लोंबार्गिनी सेंटेनरियोची डिलिव्हरी दिली असून ही कार एका मोठ्या लाकडी बॉक्समध्ये घालून दिली गेली. ही बॉक्स काळजीपूर्वक उघडून कार बाहेर काढली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दीर्घकाळच्या प्रतीक्षेनंतर ही १३ कोटी रूपये किमतीची कार पहिल्या ग्राहकाला दिली गेली असून अशा फक्त ४० कार्स बनविल्या जाणार आहेत व त्या अगोदरच विकल्या गेल्या आहेत असेही समजते.

कस्टम ब्ल्यू कलर कार्बन फायबरपासून या कारची संपूर्ण बॉडी बनविली गेली आहे. त्याच रंगाचे लेदर अंतरर्गत सजावटीसाठी वापरले गेले आहे. बाकी ३९ कार्स याच वर्षात संबंधित ग्राहकांना दिल्या जाणार असून या कस्टमाईज्ड म्हणजे ग्राहकांच्या गरजेनुसार बनविल्या जात आहेत. या कारला व्ही १२ इंजिन दिले गेले असून ती ० ते १०० किमीचा वेग फक्त २.८सेकंदात घेते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३५० किमी.