दहा रुपयांची नाणी बंद झालेली नाहीत – रिझर्व्ह बॅंक


नवी दिल्ली – नाणी बंद होणार, अशा अफवांना गेल्या काही दिवसांपासून उधान आले होते. नागरिकांमध्येही यामुळे मोठी चलबिचल सुरू झाली होती. एवढेच नाही तर बऱ्याच व्यापाऱ्यांकडूनही नाणी स्वीकारली जात नव्हती. पण आता खुद्द रिझर्व्ह बॅंकेनेच शनिवारी दहा रुपयांच्या नाण्यासह सर्वच नाणी चलनात कायम आहेत, असे सांगत ते व्यापारी अन् बॅंकांनी स्वीकारावीत, अशा सूचनाही दिल्या आहेत.

दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण ही नाणी बंद करण्याचा कोणताही निर्णय नसल्याने ते चलनात कायम राहतील, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. बॅंकांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिल्यास नागरिकांना बॅंकिंग लोकपालाकडे तक्रार करता येणार आहे.

Leave a Comment