हिरोने लॉन्च केली स्वस्त बाईक


मुंबई : आय३एस टेकनिकची एचएफ डिलक्स बाईक भारतातील बाईक उत्पादन कंपनी हिरोने लॉन्च केली असून आयडल स्टार्ट स्टॉप सिस्टमवर हिरोची ही बाईक चालते. कंपनीने याआधी स्‍पलेंडर बाईकमध्ये ही टेकनिक दिली होती. या बाईकची एक्स-शोरूम किंमत दिल्लीमध्ये ४६,६३० रुपये आहे.

शहरातील ट्रॅफिकच्या वेळेस हिरोने विकसित आय३एसच्या टेकनिकचा फायदा अधिक होणार आहे. या सिस्टममुळे बाईक थोडा वेळ उभी राहिली की ऑटोमॅटिक स्टॉप आणि पुन्हा स्‍टार्ट होते. जेव्हा बाईक न्यूट्रल गेअरमध्ये असते तेव्हा बाईक स्वत:च बंद होते. जेव्हा बाईक चालक क्लच दाबतो तेव्हा इंजिन पुन्हा ऑटोमॅटिक स्टार्ट होते आणि रायडर त्यानंतर कोणत्याही गेअरमध्ये गाडी चालवू शकतो.

इंजनबाबत म्हटले तर जुन्या एचएफ डिलक्समध्ये नाही करण्यात आला आहे. या नव्या बाईकला BS-IV एमिशन नॉर्म्सच्या हिशोबाने तयार करण्यात आले आहे. हिरो एचएफ डिलक्स आय३एसमध्ये ९७.२सीसीचे सिंगल सिलिंडर एअर कूल्ड इंजिन आहे. या इंजिनला ४ स्पीड गिअरबॉक्स आहेत. इंजिन ८००० आरपीएमवर ८.२५ बीएचपीची ताकद जनरेट करतो.

Leave a Comment