हार्ले डेव्हीडसनची इलेक्ट्रीक बाईक, लाईव्ह वायर येणार


अमेरिकेतील दुचाकी क्षेत्रातील नामवंत हार्ले डेव्हीडसन ने लवकरच त्यांच्या इलेक्ट्रीक बाईक मार्केटमध्ये आणल्या जात असल्याची घोषणा केली आहे. २०१५ मध्येही कंपनीने अशी घोषणा केली होती मात्र आता लाईव्ह वायर या नावाने येत असलेल्या पहिल्यावहिल्या इलेक्ट्रीक बाईकचा प्रोटोटाईप कंपनीने पेश केला आहे. या बाईकवर काम केले जात असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

कंपनीने अशीही घोषणा केली आहे की येत्या १० वर्षात कंपनी इलेक्ट्रीक बाईकची १०० मॉडेल्स मार्केटमध्ये आणणार आहे. वेगासाठी या बाईक हा बेस्ट ऑप्शन असून ० ते १०० किमीचा वेग ती फक्त चार सेकंदात घेते. या बाईकचे डिझाईन युनिक आहेच मात्र त्यात हार्लेची वैशिष्ठ्ये आणि प्रतिमा स्पष्ट दिसणार आहे. या बाईकला लिक्विड कूल इलेक्ट्रीक मोटर दिली गेली असून एका चार्जमध्ये ती ८५ किमीचे अंतर कापू शकेल. त्यासोबत बॅटरी पॅकही दिला जाणार आहे.

Leave a Comment