ताशी २८० किमी वेगाने पळवली विराटने कार


नवी दिल्ली – भलेही आयपीएल सीझन भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी जास्त चांगला गेलेला नाही. पण यामुळे कशाचेच दडपण विराट कोहलीवर आलेलं दिसत नाही. पहिल्यासारखीच मजा मस्ती करताना कोहली दिसत आहे. विराट कोहलीने नुकतेच अत्यंत वेगाने कार चालवत ताण दूर करण्याचा प्रयत्न केला.

विराट कोहली चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौ-याला जाण्याआधी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटच्या रेसिंग ट्रॅकवर पोहोचला. यावेळी ऑडी R8 स्पोर्ट्स कार खांद्याच्या दुखापतीतून सावरलेल्या विराट कोहलीने चालवली. २८० किमी/प्रतीतास वेगाने विराट कोहलीने कार पळवली. एवढ्या वेगाने कार चालवूनदेखील विराट आपल्या कामगिरीवर समाधानी दिसत नव्हता. कोहलीने सांगितले की यापूर्वी मी २९० किमी/प्रतीतास वेगाने कार चालवली आहे. पण यावेळी मात्र शेवटच्या टप्प्यात थोडी भीती वाटल्याने स्पीड कमी झाला. एखाद्या प्रोफेशनल ड्रायव्हरप्रमाणे आपण शेवट करु शकत नव्हतो असेही त्याने सांगितले.

Web Title: Virat run car at 280 km/ph faster