झहीरच्या नव्या लूकवर सागरिका फिदा!


भारताचा माजी जलद गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगेने त्यांच्या साखरपुड्याची बातमी दिल्यानंतर तो सगळ्यांच्याच चर्चेचा विषय बनला. या प्रेमीयुगुलाने त्यांचे हे गुपित इंडियन प्रिमियर लीगच्या दहाव्या सिझनदरम्यानच सर्वांसमोर आणले होते.

नुकताच झहीरसोबतचा एक फोटो सागरिकाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिने त्यास रंजक कॅप्शनही दिले आहे. ‘या अनोळखी व्यक्तीसोबत मी घरी परतले आहे.’ तिने या कॅप्शमध्ये झहीरला मेन्शन केले असून, त्यास ‘ब्रेक द बिअर्ड’ ( #breakthebeard ) हा हॅशटॅगही दिला आहे. यात झहीरचा क्लिन शेव्ह केलेला लूक पाहावयास मिळतो. सागरिका त्याच्या या नव्या लूकवर भलतीच फिदा झालेली दिसत आहे.

Came back home to this stranger @zakkhan34 doing #breakthebeard rather well ?

A post shared by Sagarika Ghatge (@sagarikaghatge) on

Web Title: This is how Sagarika Ghatge reacted to Zaheer Khan's new look