विकिलीक्सला बलात्कार प्रकरणी दिलासा


नवी दिल्ली – जुलियन असांज यांच्याविरोधात सुरु असलेल्या बलात्कार प्रकरणाची चौकशी स्वीडनच्या सरकारी वकिलांनी बंद केल्यामुळे विकिलीक्सचे संस्थापक असलेल्या जुलियन असांज यांना मोठा दिलासा मिळाला आहे. २०१२ पासून ब्रिटनमधील इक्वेडोरच्या दुतावासात जुलियन असांज आश्रयाला आहेत.

जुलियन असांज यांच्याविरोधातील बलात्कार प्रकरणाचा तपास स्वीडनच्या सरकारी वकिलांनी थांबवला असून जुलियन असांजवरील बलात्कार प्रकरणाचा तपास थांबवण्याचा निर्णय सरकारी वकिलांनी घेतला असल्याचे स्वीडन सरकारने एका माहितीपत्रकाद्वारे म्हटले आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप जुलियन असांज यांच्यावर आहेत. पण आपल्यावरील आरोप असांज यांनी कायम फेटाळले आहेत. एका व्याख्यानासाठी २०१० मध्ये असांज स्टॉकहोममध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते.

त्याचबरोबर विकिलीक्सचे संस्थापक जुलियन असांज यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले वॉरंटदेखील रद्द करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती विकिलीक्सने ट्विटरवरुन दिली आहे. जुलियन असांज यांच्या अटकेसोबतच त्यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्नदेखील स्वीडनकडून सुरु होते. मात्र आता बलात्कार प्रकरणाचा तपासच थांबल्याने असांज यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Swedish prosecutor drops rape probe into WikiLeaks' Assange