बाहुबलीने गाठला १५०० कोटींचा टप्पा


‘बाहुबली २’ चित्रपटाने आपल्या नावावर असे काही रेकॉर्ड केले आहेत जे सहजासहजी तोडणे शक्य नाही. १५०० कोटींचा पल्ला चित्रपटाने गाठला असून कमाईच्या बाबतीत सर्वोच्च शिखर गाठले आहे. आतापर्यंत १०० कोटी कमावल्यावर जंगी पार्टी करणा-या बॉलिवूडकरांनी तर तोंडात बोट घातली आहेत. १५०० कोटींची कमाई चित्रपटाने केली असून अद्यापही घोडदौड सुरु आहे. हा आकडा नेमका कितीपर्यंत पोहोचणार आहे हे येणारी वेळ सांगेल.

याआधीच १००० कोटींची कमाई करत ‘बाहुबली २’ ने सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा मान मिळवला आहे. एस. एस. राजामौली यांचा ‘बाहुबली २’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांना अखेर दोन वर्षांनंतर कटप्पाने बाहुबलीला का मारले याचे उत्तर मिळाले. बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. ‘बाहुबली २’ या सिनेमाची जादू केवळ भारतातच नाही तर सात समुद्रापारही पाहायला मिळत आहे. एकट्या अमेरिकेत १०० कोटींची कमाई करणारा बाहुबली हा पहिलाच भारतीय चित्रपट ठरला आहे. तर जगभरात १००० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्याचा मानही या चित्रपटाने पटकावला आहे.

Web Title: Rs 1500 crores reached by Bahubali