सुरक्षा अधिभारामुळे रेल्वे तिकिटांचे दर वाढणार


नवी दिल्ली – सामान्य श्रेणीतील रेल्वे तिकिटांवर सरकार आता सुरक्षा कर लावणार असून हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने तिकिट दरांवर रेल्वे मंत्रालयाकडून २ टक्के सुरक्षा अधिभार लावणार असल्याचे वृत्त दिले आहे. रेल्वे प्रवास सुरक्षित करण्यासाठी यामधून मिळणाऱ्या रकमेचा वापर केला जाणार आहे.

९४% ऐवढी रेल्वेच्या सामान्य श्रेणीतून आणि आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या असल्यामुळे सुरक्षा अधिभारामुळे वाढलेल्या तिकिट दरांचा फटका देशातील कोट्यवधी लोकांना बसणार आहे. एसी-१ आणि एसी-२ श्रेणीतील तिकिटांचे दर मागील काही वर्षांपासून वाढवण्यात आले आहेत. मात्र या तिकिट दरवाढीचा सामना सामान्य श्रेणी आणि आरक्षणाशिवाय प्रवास करणाऱ्यांना करावा लागला नव्हता. पण आता सुरक्षा अधिभारामुळे या प्रवाशांनादेखील तिकीट दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. यासोबतच उपनगरीय रेल्वे गाड्यांच्या तिकिटांच्या दरातदेखील वाढ होणार आहे.