जीएसटीमुळे अन्नधान्य होणार स्वस्त


नवी दिल्ली – गुरुवारपासून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या बैठकीला सुरुवात झाली असून काही महत्वपूर्ण निर्णय या बैठकीच्या पहिल्या दिवशी घेण्यात आले आहेत. जवळपास ९० टक्के वस्तूंसाठी किती जीएसटी आकारला जावा हे बैठकीच्या पहिल्या दिवशी निश्चित करण्यात आले आहे.

चार स्तरांचे दर प्रस्तावित जीएसटी व्यवस्थेमध्ये समोर ठेवण्यात आले आहेत ज्यामध्ये दररोजच्या आयुष्यात वापरल्या जाणा-या वस्तुंवर ५ टक्के ठेवण्यात आली आहे. जीएसटीशी संबंधित बैठकीत ९ पैकी ७ नियमांना मंजूरी देण्यात आली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या मते इतर २ नियमांना कायदेशीर समिती पाहत आहे. तसेच सर्व्हिस टॅक्सवरही आज निर्णय घेतला जाईल.

चहापत्ती, कॉफी, मिठाई आणि कोळश्यावर जीएसटीमुळे ५ टक्के लावण्यात आला आहे. हेअर ऑईल, टूथपेस्ट आणि साबणावर १८ टक्के टॅक्स लावला आहे. सध्या या वस्तुंवर २८ टक्के कर लावला जातो. कोळसा आणि मसाल्यांवर ५ टक्के टॅक्स, करमणूक, हॉटेल आणि रेस्टॉरेंटवर १८ टक्के टॅक्स लागणार आहे. एसी आणि फ्रिजला सुद्धा २८ टक्के टॅक्सच्या गटात ठेवण्यात आले आहे. सध्या यावर ३० ते ३१ टक्के टॅक्स लावला जातो.

वस्तु आणि सेवा कर व्यवस्था नुसार नियमांना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या परिषदेने बैठकीच्या पहिल्या सत्रात मंजुरी दिली आहे. एक जुलैपासून जीएसटी लागू करण्याची सरकारची योजना असून सर्व राज्यांचे अर्थमंत्री किंवा त्यांचे प्रतिनिधी या जीएसटी परिषदेत सहभागी झाले आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ९० टक्के वस्तूंसाठी किती जीएसटी आकारला जावा हे निश्चित करण्यात आलेलं आहे. सेवांबाबतचा निर्णय आज घेण्यात येणार आहे.

Leave a Comment